जरीन खानची सटकली ! चाहत्याच्याच कानाखाली काढला आवाज

Foto

औरंगाबाद - कॅनॉट प्लेस औरंगाबाद येथे सेलेक्ट या शोरूमच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खान यांनी हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन हाणामारी सुरु झाली. यात अभिनेत्री जरीन सुद्धा मागे राहिली नाहीतिनेही एका चाहत्याच्या कानशिलात वाजवली. त्यामुळे अभिनेत्री जरीन खान हिला तब्बल दोन तास शोरूम मधेच अडकून  पडावे लागले.

शुक्रवारी औरंगाबाद येथील कॅनॉट प्लेस मध्ये सेलेक्ट शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री जरीन खान उपस्थित होत्या. याप्रसांगी शोरूम मालकाने कुठलाही पोलिस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर गर्दीला नियंत्रित करण्यासाठी बोलावले होते. दरम्यान चाहते आणि बाउन्सर यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात झाली. हातात लोखंडी रॉड आणि दगड घेऊन चाहते रस्त्यावर राडा करू लागल्याने प्रकरण शांत होण्यास वेळ लागत होता.  एक चाहता जरीनच्या जवळ गेला असता तिने त्या चाहत्याच्या कानशिलात वाजवली. यावेळी संतप्त तरुणांनी कॅनॉट प्लेस मधील बॅरिकेट्स आणि उभ्या असलेल्या दुचाकी फोडल्या. ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे अभिनेत्री जरीन खान यांना शोरूममध्येच तब्ब्ल  दोन तास बसून काढावे लागले.